अवकाळी पाऊस...
ओझरत्या धारा
ओझरती नजर,
पहिला कटाक्ष
पहिला पाऊस,
दोन्ही अविस्मरणीयच असतं...
अंगावरून हळुवार जाणारा वारा
अन अलगद स्पर्शून जाणारा हात,
दोन्ही अल्हाददायकचं असत...
आकाशात गडगडणारी वीज अन
दोन जीवांमधले कडाडणारे संवाद,
अवकाळी पडणारा पाऊस
अन विश्वास मोडणारं प्रेम,
दोन्ही खोलीचं तयार करतात मनात...
- ©प्रियंका पठाडे
Mast😘🤘🏻🤘🏻👍🏻🤟🏻
ReplyDeleteNice
ReplyDeleteThank you
DeleteThank you
ReplyDelete