काय वाटत असेल ...!
काय वाटत असेल मनाला? जेव्हा भेटेल पाहिजे ते त्याला त्रिभुवनही ठेंगण होत असेल अन् गगणातही आनंद मावत नसेल... हर्षाचा पारावर राहत नसेल अन् मनाला आनंदाच उधाण आलेलं असेल... जसा आकाशात पक्षी निडभिस्त उडत असेल तसच मन हे स्वच्छंदी भिरभिरत असेल... खरचं अकल्पनिय, अविस्मरणीय असेल जेव्हा मनाला पाहिजे ते भेटेल... खरचं काय वाटत असेल मनाला? जेव्हा भेटेल पाहिजे ते त्याला... - ©प्रियंका पठाडे (p3)