Posts

Showing posts from March, 2018

पात्र!

जगणं म्हणजे जीवन नसतं उमलणं म्हणजे फुलण नसतं हसणं म्हणजे सुख असतं! रडणं म्हणजे दुःख असतं! कस असत! दाखवल तस दिसतं पण मुळात मात्र तसं नसतं हसू कधी दुःख लपवण्याचा आधार बनतं तर रडू कधी सुखाचं उधाण असतं आयुष्यच असच असतं जगण्यासाठी विविध पात्र निभवाव लागतं... -©प्रियंका पठाडे(P3)

चकवा-मृगजळ

चकवा-मृगजळ परत तीच वाट पुन्हा तोच रस्ता... चकवा तर नसावा ना! नाही, मृगजळ असेल कदाचित... परत फिरून तिथेच आलं मन कित्येक महिन्यांपूर्वी जिथं सोडलं होत... म्हंटला जरी चकवा तर काही वेळाने निघून जातो दिसलं जरी मृगजळ तरी क्षणात विरून जातं... हे थोडसं अवचितच घडतंय ना वेळ निघतोय, ना क्षण विरतोय... भरकटलेलं मन फक्त कायमचं कुणीतरी आपलसं करणारी जागा शोधतय... -©प्रियंका पठाडे (P3)