रंगांची उधळण...
अनमोल अशा जीवनात असो रंगांची अनमोल अशी उधळण रंगांच्या या उधळणीत रंगून जावो प्रत्येकजण रंगलेल्या त्या चेहऱ्यामागील दुःख हि जावो रंगून रंगलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर सुख यावे उमटून उमटलेल्या सुखात असावे पावित्र्यपूर्ण आनंद आनंदाच्या भरात जाळून टाकावी नैराश्याची होळी भरभरून खेळावी ती उत्साहाची होळी प्रत्येकालाच रंगवा त्या प्रेमाच्या रंगात विसरून जा तो जात, धर्म लक्षात ठेवा फक्त इंद्रधनुष्य उमटून येते इंद्रदनुष्य सप्तरंगात त्यात नसतो भेदभाव असते फक्त एकता रंगांच्या उधळणीत असो पाण्याचा ओलावा, अन् रंगांचा धुरळा ज्यात असो प्रेमभावना ज्या उतरून येवोत प्रत्येकाच्या प्रत्यक्ष आयुष्यात - ©प्रियंका पठाडे (p3)