संवेदना...
प्रत्येक क्षण नाही करता येत कैद, डिजीटल डोळ्यात... पाण्याचं संथ गतीने वाहनं तर किलबिलाट करणाऱ्या पक्षांच गाणं... संवेदनाच हव्या त्याला पाण्याचा गारवा जाणवायला... तर गुदगुल्या करून जाणाऱ्या वाऱ्याशी गुपितं करायला... सळसळ करणाऱ्या पानांचं कानात गुंज करायला... अन झरझर करत अलगद पिवळी पाने हातात यायला... डोळे म्हणजे दरी असावी निसर्गाचं वैभव साठवायला... प्रेमळ स्पर्श असावा मऊ मऊ माती हातात घ्यायला... निरभ्र असू दे कायम विचार तुझा... आसमंताला ही कवेत घेता यावां इतका... निसर्गही तुझ्या प्रेमात पडेल... नितळ तुझं मन जर असेल!!! -©प्रियंका(P3)