Posts

Showing posts from November, 2020

आम्हीच आमच्या जीवनाचे "कोरोनाकार"

 आम्ही मालक आमचे आमच्या घरचे, आमच्या मर्जीचे. ना मास्क,ना हॅन्डवॉश पडून बाहेर आम्ही करणार समूळ मानव जातीचा सर्वनाश. कसलं आलं लॉकडाऊन! डावलून सारे नियम आम्ही बनू आमच्याच जीवनाचे रावण. क्वारणटाईन तर नुसतंच नावाला शिक्का असला हाताला, तरी आम्ही डॉक्टर पोलिसांची नजर चुकवून पळणार. काय फरक पडतो सारी असो वा कोरोना ! पर्वा कुठे आमच्या अमूल्य जीवांना. आमच्यासाठी पोलीस डॉक्टर जीव धोक्यात घालणारे, आम्ही निर्लज्ज मात्र त्यांच्याच जीवावर उठणारे . आमच्यासाठी मात्र मातीमोल आमचं अस्तित्व, उपकार त्या संरक्षणकर्त्यांचे जे वर्दीत सदैव तठस्त. स्वार्थासाठी/मौजेसाठी आम्ही बाहेर फिरणारे माणुसकीवर कलंक. ध्यानीमनी आणा डॉक्टर जे आपल्या चिमुकल्यांना घरी सोडून आहेत कर्तव्यावर. किती हा असुरीपणा ! कोरोना नंतर, अगोदर माणूसच माणसाचा बळी चढवणार काळ आलाय, पण वेळ नाही. हे शक्य होईल; जेव्हा प्रत्येक माणूस घरात राहील. देव अवतरलाय पोलीस , डॉक्टर, नर्स, सफाई कामगारांच्या रुपात. खारीचा वाटा आपलाही असू दे या कामात, राहूया घरात करूया सुरक्षित सारा समाज. - ©प्रियंका पठाडे