आभाळीचा चंद्र 🌙

आभाळीचा चंद्र तो

शांत, थंड, गोल...


छोटे-मोठे डाग घेऊन चेहऱ्यावरती,

तो परिपूर्ण त्याच्या अपूर्णेतेतच...


दूर असतो कित्येक मैल तरी असतो अगदी जवळ...


ना त्याचा रंग,ना त्याचा आकार,

मनाला भावतो फक्त त्याचा स्वभाव...


प्रत्येकाला तो नभी असतो रोज हवाहवा

आपापल्या मनातील हितगुज कराया...


तो ऐकत असतो एकचित्त होऊन कुणाचं सुख, कुणाचं दुःख तर कुणाचं अर्धवट राहिलेलं प्रेम...


अंधारात प्रकाश देतो, हरवलेला मार्ग दाखवतो,

तप्त झालेल्या मनाला शीतलता देतो तो आभाळीचा चंद्र...


शेवटी कितीही डोळे दिपवणारा,विशाल,लख्ख असू दे सूर्य, पण मनाच्या हळव्या गाभाऱ्याला हवा असतो फक्त आभाळीचा चंद्र...


- ©प्रियंका पठाडे औटी






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मैं काफ़ि हूं ।

आम्हीच आमच्या जीवनाचे "कोरोनाकार"