||समांतर रेषा||

हो! दोन समांतर रेषाचं त्या
कायमच सोबती करणाऱ्या...

स्पर्शल्या जरी नव्हत्या
तरी सोबतीच्या आशा कायम ओथंबलेल्या...

क्षितिजाकडे आकांतलेल्या त्या नजरा
भेटेल ना ती दोन्ही एका किनाऱ्या...

हयातीतच नव्हता समुद्राचा दुसरा किनारा
कशा मिळणार होत्या? दोन समांतर रेषा...

अनपेक्षितच होतं मिलन प्रत्यक्षात
पण झाल्या एक त्या, क्षितीजाच्या सुर्यास्ताला...


-©प्रियंका पठाडे (p3)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळीचा चंद्र 🌙

मैं काफ़ि हूं ।

आम्हीच आमच्या जीवनाचे "कोरोनाकार"