अस्वस्थता!¡

थोडंस वेगळंच आहे सूत्र
माझा अन त्याचं

मी अस्वस्थ असले की
साथ त्याची हवी असते मला

पण एकटेपणा माझ्यापेक्षा ही जवळचा त्याचा
कारण माझ्यापेक्षा त्याचीच साथ हवी असते त्याला

प्रयत्न तो करत असतो मला स्पेस देण्याची
धडपडत मी असते त्याला बोलतं करायची

कदाचित दोघेही आपापल्या जागी बरोबर आहे
पण संतुलन अजूनही कुठेतरी बिघडतयं

कारण मला शब्द हवे असतात त्याचे
अन त्याला अबोला हवा असतो त्या शब्दांचा

विचित्र 'अवस्था' होऊन जाते त्या 'अस्वस्थेत'
मोकळा श्वास गुदमरायला लागतो कारण....

मला शब्द हवे असतात त्याचे
अन त्याला अबोला हवा असतो त्या शब्दांचा


-©प्रियंका पठाडे(P3)

Comments

  1. फारच छान आहे तुझे शब्द 👌👍

    ReplyDelete
  2. अप्रतिम शब्द! प्रियंका... फारच सुंदर 👏👏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळीचा चंद्र 🌙

मैं काफ़ि हूं ।

आम्हीच आमच्या जीवनाचे "कोरोनाकार"