Posts

आभाळीचा चंद्र 🌙

आभाळीचा चंद्र तो शांत, थंड, गोल... छोटे-मोठे डाग घेऊन चेहऱ्यावरती, तो परिपूर्ण त्याच्या अपूर्णेतेतच... दूर असतो कित्येक मैल तरी असतो अगदी जवळ... ना त्याचा रंग,ना त्याचा आकार, मनाला भावतो फक्त त्याचा स्वभाव... प्रत्येकाला तो नभी असतो रोज हवाहवा आपापल्या मनातील हितगुज कराया... तो ऐकत असतो एकचित्त होऊन कुणाचं सुख, कुणाचं दुःख तर कुणाचं अर्धवट राहिलेलं प्रेम... अंधारात प्रकाश देतो, हरवलेला मार्ग दाखवतो, तप्त झालेल्या मनाला शीतलता देतो तो आभाळीचा चंद्र... शेवटी कितीही डोळे दिपवणारा,विशाल,लख्ख असू दे सूर्य, पण मनाच्या हळव्या गाभाऱ्याला हवा असतो फक्त आभाळीचा चंद्र... - ©प्रियंका पठाडे औटी

अवकाळी पाऊस...

ओझरत्या धारा ओझरती नजर, पहिला कटाक्ष  पहिला पाऊस, दोन्ही अविस्मरणीयच असतं... अंगावरून हळुवार जाणारा वारा अन अलगद स्पर्शून जाणारा हात, दोन्ही अल्हाददायकचं असत... आकाशात गडगडणारी वीज अन दोन जीवांमधले कडाडणारे संवाद, अवकाळी पडणारा पाऊस  अन विश्वास मोडणारं प्रेम, दोन्ही खोलीचं तयार करतात मनात... - ©प्रियंका पठाडे

आम्हीच आमच्या जीवनाचे "कोरोनाकार"

 आम्ही मालक आमचे आमच्या घरचे, आमच्या मर्जीचे. ना मास्क,ना हॅन्डवॉश पडून बाहेर आम्ही करणार समूळ मानव जातीचा सर्वनाश. कसलं आलं लॉकडाऊन! डावलून सारे नियम आम्ही बनू आमच्याच जीवनाचे रावण. क्वारणटाईन तर नुसतंच नावाला शिक्का असला हाताला, तरी आम्ही डॉक्टर पोलिसांची नजर चुकवून पळणार. काय फरक पडतो सारी असो वा कोरोना ! पर्वा कुठे आमच्या अमूल्य जीवांना. आमच्यासाठी पोलीस डॉक्टर जीव धोक्यात घालणारे, आम्ही निर्लज्ज मात्र त्यांच्याच जीवावर उठणारे . आमच्यासाठी मात्र मातीमोल आमचं अस्तित्व, उपकार त्या संरक्षणकर्त्यांचे जे वर्दीत सदैव तठस्त. स्वार्थासाठी/मौजेसाठी आम्ही बाहेर फिरणारे माणुसकीवर कलंक. ध्यानीमनी आणा डॉक्टर जे आपल्या चिमुकल्यांना घरी सोडून आहेत कर्तव्यावर. किती हा असुरीपणा ! कोरोना नंतर, अगोदर माणूसच माणसाचा बळी चढवणार काळ आलाय, पण वेळ नाही. हे शक्य होईल; जेव्हा प्रत्येक माणूस घरात राहील. देव अवतरलाय पोलीस , डॉक्टर, नर्स, सफाई कामगारांच्या रुपात. खारीचा वाटा आपलाही असू दे या कामात, राहूया घरात करूया सुरक्षित सारा समाज. - ©प्रियंका पठाडे

मैं काफ़ि हूं ।

कभी कुछ सोचा भी तो मुझे जरूर बताना। मुझे जरुरी समझो ,या ना समझो अपनी सोच को मुझ तक जरूर पोहचाना। ये खाली दिमाग एक बार चल जायेगा, बस शैतानो वाले विचार इसमे आणे न देना। अकेला पण मेहसुस हुआ, तो जमाना है गुफ्तगु करणे पर अकेले छोड के जाओगे तो हम अकेले हो जायेंगे। ऐसा कोई सवाल नहीं, जिसका जवाब ना हो ऐसी कोई राह नहीं, जिसकी मंजिल ना हो तुम क्या सोचते हो, ये मेरे लिये एहेम हैं तुम इन्सान हो मैं इन्सान हू, मेरे लिये यही काफी हैं। चलो हम दोनो आज खुशी नहीं, दुख बाट के नई जिंदगी शूरु करते हैं। बस छोटी मुश्किल तो है, आज नहीं तो कल सुलझ जायेगी अकेला हू तो क्या कल पुरी दुनिया मेरी होगी। - ©प्रियंका पठाडे

हमारी हिरोगीरी तो 'इसिमें' है ।

" भाई तुने तो बस अर्जुन रेड्डी बनना है । "  खरं प्रेम करतो यार तू तिच्यावर मानलं तुला, तुझ्यात आणि कबीर सिंग मध्ये तोड नाही. अपना कबीर सिंग है भाई तू । ऐक लेका, पण तू दे सोडून विषय कुठे डोक्याला खुराक! दुसरी पटवू ही गेली तर, मग तर झालं.  प्रत्यक्ष कानावर पडलेल्या या संवादाने नकळतपणे थोडी भुवई उंचावली गेली.   कसली 'हेरोगिरी' वाटत असेल बरं, चित्रपटातील 'अशा' पात्रांना प्रत्यक्ष आयुष्यात मूर्त स्थान देतांना ? पण त्यापूर्वी हा प्रश्न (क्वचित) तरुणांना पडला हे जरा महत्वाचं नाही का !   त्यात लगेच कॉलर टाईट व्हावी अशातला भाग नाही पण हा प्रश्न पडण्याइतपत आपल्याला डोक्याचा भाग आहे ही जाणीव पुष्कळ.   बरं मुद्यावरुन भटकणं नको. मला काय म्हणायचंय 'कबीर सिंग/अर्जुन रेड्डीला' एवढं डोक्यावर घेऊन मिरवण्याचा मानस काय असावा की प्रत्यक्ष जीवनात त्यांची स्वतःशी तुलना करावी ? का ती 'हिरोगीरी' आर्टीकल 15 मधल्या 'अयान रंजन'ला किंवा थोडं मागं गेलं तर एअरलिफ्ट मधल्या 'रंजित कटियाला'ला बघून येत नाही?   नाही, आता लगेच बरेच जण आपलं मत मांडतील की, होतो

रंगांची उधळण...

अनमोल अशा जीवनात असो रंगांची अनमोल अशी उधळण रंगांच्या या उधळणीत रंगून जावो प्रत्येकजण रंगलेल्या त्या चेहऱ्यामागील दुःख हि जावो रंगून रंगलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर सुख यावे उमटून उमटलेल्या सुखात असावे पावित्र्यपूर्ण आनंद आनंदाच्या भरात जाळून टाकावी नैराश्याची होळी भरभरून खेळावी ती उत्साहाची होळी प्रत्येकालाच रंगवा त्या प्रेमाच्या रंगात विसरून जा तो जात, धर्म लक्षात ठेवा फक्त इंद्रधनुष्य उमटून येते इंद्रदनुष्य सप्तरंगात त्यात नसतो भेदभाव असते फक्त एकता रंगांच्या उधळणीत असो पाण्याचा ओलावा, अन् रंगांचा धुरळा ज्यात असो प्रेमभावना ज्या उतरून येवोत प्रत्येकाच्या प्रत्यक्ष आयुष्यात - ©प्रियंका पठाडे (p3)

खून तो अब खौल उठा है....

जब चेहरे की मुस्कान खून की आँसुओं में बदली हैं, खून तो भारतवासियों का तब खौलना हैं... जब वार पिछे से किया है तब अंजाम तो अब तुम्हे भुगतना है, क्यो की खून तो अब खौल उठा है.... उस देश से तुम्हारा पाला पडा है जिससे जिंदा बचना अब तुम्हारा नामुमकिन है, क्यो की खून तो अब खौल उठा है.... जब गीदड़, भेड़िये औकात लगे दिखाने तो सिंह को अब दहाड़ना है, क्यो की खून तो अब खौल उठा है.... रक्त के एक एक बूंद का बदला अब एक एक काफ़िलो से लेना है इन आदमखोर दरिंदो का सर्वनाश तो होना ही हैं, क्यो की खून तो अब खौल उठा है.... समझौता तो अब होगा नही, खामोशी भी आग बनी हैं दुनिया से तो अब वो उठणे हैं, आतांकी हमले जिन्होंने किये हैं, क्यो की खून तो अब खौल उठा है.... -©प्रियंका पठाडे